सुपरस्टार रजनीकांत चक्क योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले, Video व्हायरल

सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौ येथे भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली. यावेळी रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर दोघांनीही ‘जेलर’ हा चित्रपटही एकत्र पाहिला.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने रजनीकांत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रजनीकांत गाडीतून उतरून आधी हात जोडून नमस्कार करताना आणि नंतर पाया पडून योगींचे आशीर्वाद घेताना दिसले. योगींनीही फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

 

ताजा खबरें