सुनसगावात पाणीपुरवठा पुर्ववत सुरू!

भुसावळ – येथे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने भर उन्हाळ्यात महिला व पुरुषांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती त्याच प्रमाणे वयोवृद्ध व्यक्तींना हाल सोसावे लागत होते आणि गुरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते.या बाबत जळगाव संदेश ने ‘ सुनसगावात कृत्रिम पाणी टंचाई ‘ या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती .या बातमीचे सामूहिक वाचन केले गेले .

वास्तविक पाहता सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावर असताना अशी काही समस्या निर्माण झाली तर तातडीने पर्यायी व्यवस्था केली जात होती . आता मात्र प्रशासक असल्यामुळे गेल्या तीन चार दिवस पाणीटंचाई निर्माण झाली विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने विज पंप नविन आणलेला होता मात्र त्यात बिघाडामुळे व दुसरा विजपंप नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. शनिवारी संध्याकाळी विजपंप बंद पडला आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सोमवारी दुरुस्तीसाठी पंप जळगाव येथे नेण्यात आला व मंगळवारी पंप मिळाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे ग्रामसेविका यांनी सांगितले. तसे पाहता आज रोजी ग्रामपंचायतीच्या मालकीचे चौदा विजपंप आहेत मात्र ते नादुरुस्त आहेत असे सांगितले जात आहे. जळगाव संदेश ने दिलेल्या बातमीची दखल ग्रामसेविका व पाणीपुरवठा कर्मचारी तसेच कर्मचारी यांनी घेऊन गावासाठी पाणीपुरवठा सुरू केल्याने कौतुक करण्यात येत आहे तर गावातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामसेविका यांनी सांगितले आहे आपल्या समस्या ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने मांडाव्यात असे सांगितले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh