प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे वार्ड क्रमांक दोन मधील टुलाराम सुधाकर पाटील यांच्या घराजवळ असलेले विज रोहित्र दि.३१ मार्च रोजी दुपारी अचानक जळाल्याने वार्ड क्रमांक दोन मधील नागरिकांना रात्रभर अंधारात राहण्याची वेळ आली तर ऐन उन्हाळ्यात रोहित्र जळाल्याने आबालवृद्ध हैराण झाले आहेत.
या बाबत विज वितरण कंपनीच्या संबंधितांशी संपर्क साधला असता दि.१ एप्रिल रोजी दुपार पर्यंत नविन व्यवस्था करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र कोणीच पाठपुरावा न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.