सुनसगावच्या प्रणव धनायते यांची भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी निवड!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील धनगर समाजाला वैभव प्राप्त करून देणारे प्रणव रामचंद्र धनायते यांची नौदलात लेफ्टनंट पदी निवड झाली असल्याने त्यांचा सुनसगाव येथे भव्य सत्कार करण्यात आला.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, मुळ मायसांगवी ता. यावल येथील रहिवाशी असलेले धनायते कुटुंब बऱ्याच वर्षांपासून येथे राहत आहे वास्तविक पाहता शेती व मजुरी करून या कुटुंबातील सदस्य आपला उदरनिर्वाह चालवत होते त्यात रामचंद्र राजाराम धनायते हे सैन्यात भरती झाले. तेव्हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ म्हणून घरच्यांचा विरोध होता मात्र मित्र मंडळाने उभारी दिली आणि रामचंद्र धनायते यांची आयुष्याला सुरुवात झाली त्यात साकेगाव येथील चांगल्या घरातील गुणी मुलगी अनिता यांच्याशी विवाह झाला. यांच्या संसार वेलीवर प्रतिक्षा आणि प्रणव हे दोन सुंदर फुले उमलली आणि आपल्या मुलांना शिकवून मोठे करणार हे ध्येय धनायते दाम्पत्याने ठरविले मुलगा प्रणव याला कोटा राजस्थान आणि नगर जिल्ह्यात सैनिकी शाळेत शिक्षण दिले . अखेर सध्या आळंदी ( देवाची) पुणे येथे वास्तव्यास असलेल्या या कुटुंबातील प्रणव नामक हिरा चमकला आणि त्याचे भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी निवड झाली. सुनसगावात ही बातमी माहिती पडल्याने नुकतेच संपूर्ण कुटुंबाचा सत्कार धनगर समाजाच्या वतीने आणि गावातील पदाधिकारी यांनी केला. यावेळी गावातील समाज बांधवांच्या सत्काराला उत्तर देताना समाजातील तसेच गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने देशसेवेसाठी भरती व्हावे असे आवाहन प्रणव धनायते यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन दिलदार मित्र मंडळाने केले होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र पोलीस प्रमोद कंकरे यांनी केले.यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते रेवा कंकरे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुनिल कंखरे, प्रतिक मेडिकल चे संचालक अरुण काटे , धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ सपकाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुरेखा पाटील व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh