(शाम्पू, साबण, व्हिक्स डब्या, टूथपेस्ट व इतर साहित्य )
प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील वाघुर नदीच्या पात्रात पुलावरून नशिराबाद भागाकडून अज्ञात व्यक्तींनी काही सामानाच्या पिशव्या व थैल्या नदी पात्रात टाकल्या असल्याने ग्रामस्थ व परिसरातील नागरिक संभ्रमात पडले आहेत.
या बाबत माहिती अशी की, काही दिवसांपासून गावात चर्चा सुरू होती की सुनसगाव वाघुर नदीच्या पात्रात पुलावरून काही अज्ञात व्यक्तींनी सामानाच्या थैल्या फेकल्या आहेत या बाबत जळगाव संदेश चे भुसावळ तालुका प्रतिनिधी जितेंद्र काटे यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी पाहणी केली असता नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दी कडून काही अज्ञात व्यक्तींनी खरोखरच साहित्य फेकले आहे त्यात व्हिक्स डब्या, शाम्पू पाकिट, खोबरेल तेलाच्या लहान बाटल्या, टूथपेस्ट, साबण व काही पावडर असा प्रकार आहे आणखी जर या थैल्या बाहेर काढल्यावर अनेक वस्तू निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी नदी काठावरील श्री नवनाथ मंदीराच्या पुर्वेकडे वाघुर नदीच्या पात्रात अशाच प्रकारे लोणचे, खोबरेल तेल, गरम मसाला व अनेक खाली बरण्या असे साहित्य फेकलेले होते. हे फेकणारे कोण ? याचा तपास होणे आवश्यक आहे कारण या नदीपात्रात गुरे, मेंढ्या बकऱ्या पाणी पितात त्यामुळे या प्राण्यांना विषबाधा होऊ शकते त्यामुळे जे कोणी अज्ञात व्यक्ती असे कृत्य करीत असतील त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे असे परीसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.