प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – ग्रामिण भागात बैलगाडी हे वाहन म्हणून सहसा कोणी वापर करीत नाही बालकांपासून तर वयोवृद्धांना मोटरसायकल वर कार चे आकर्षण असते मात्र येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये आज शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांना बैलगाडी सजवून गावातून ढोल ताशांच्या गजरा मध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली . यावेळी मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांची वेशभूषाही केलेली होती. प्रभात फेरीनंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे शिक्षिकांनी औक्षण केले नंतर मुलांनी प्रवेशद्वारावरच शाळेला व गुरुजनांना वंदन केले त्यानंतर प्रत्येक मुलाने व्यासपीठावर जाऊन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून वंदन केले नंतर नंतर शाळेचे संस्थेचे सदस्य सुदाम भोळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ काजल भोजराज सपकाळे, उपसरपंच एकनाथ सपकाळे ग्रामपंचायत सदस्या, रत्नप्रभा विकास पाटील, वैशाली युवराज पाटील, शोभा शिरसाळे या मान्यवरांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना चॉकलेट दिली. नंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये मुलांना शासनाने पाठवलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक जे पी सपकाळे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शाळेबद्दल व वर्षभर चालणाऱ्या विविध योजनांची विविध कार्यक्रमांची माहिती सांगितली. यावेळी संस्थेचे सदस्य सुदाम भोळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सुनसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामपंचायतीचे उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते भोजराज आत्माराम सपकाळे उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी मुलांचे औक्षण करून विद्यार्थांचे स्वागत करण्यात आल्यामुळे मुले भारावून गेलेली होती. नंतर शालेय पोषण आहार वाटप करताना मुलांना गोड आहार म्हणून शिरा वाटप करण्यात आला यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी. तायडे यांनी केले तर आभार एच.बी.साळुंखे यांनी मानले.