सुनसगाव ग्रामपंचायत मालकीची इमारत पडली ? (इमारतीत सापडले सन १९५२ पासून चे कागदपत्रे)

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – सध्या सर्वत्र पावसाने कहर केला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी घरे पडणे , भींती पडणे अशा घटना घडत असतांना येथील ग्रामपंचायत मालकीची जुनी इमारतीचा (चावडी) दुसऱ्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला मात्र जिवितहानी टळली.

येथील जुनी ग्रामपंचायत म्हणजे जुन्या काळातील चावडी अतिशय मजबूत असलेली दुमजली इमारत आहे परंतु सन १९८५ च्या सुमारास नविन इमारत बांधण्यात येऊन सर्व व्यवहार नविन इमारतीत सुरू झाले त्यामुळे जवळपास३५ ते ४० वर्षापासून या इमारतीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी या चावडीचा भाग कोसळला परंतु अनेकांना ही इमारत कोसळल्याची माहिती नव्हती. परंतु या बाबर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम भोळे पत्रकार जितेंद्र काटे यांना सांगीतले असता उपसरपंच एकनाथ सपकाळे , युवराज पाटील., दिनकर बुधो पाटील ,सुनिल भोळे ,सचिन शिरोळे ,पंकज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पडलेला अस्ताव्यस्थ सामान गोळा करताना एका बाजूला असलेली मोठी लोखंडी पेटी उघडली असता तत्कालीन कर्मचारी कै रामकृष्ण धनजी ढाके यांनी सन१९५२ साला पासून तत्कालीन सर्व दाखले व कागदपत्रे असलेला ग्रामस्थांचा महत्वाचा असलेला एक प्रकारचा खजिना सापडल्याचे सांगीतले जात आहे. या बाबत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना माहिती देण्यात आली आहे.

ही महत्वाची सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतीच्या नविन इमारतीत आणण्यात आली आहेत.

वास्तविक पाहता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर या चावडीची दशा बदलू शकते व तीन चार परिवार भाडे तत्वावर राहू शकतात मात्र आता या इमारतीची दुरुस्ती करण्यात येईल काय ? असा प्रश्न सुज्ञ ग्रामस्थांनी विचारला आहे.

ताजा खबरें