सुनसगाव ग्रामपंचायत कार्यालयात संत गोरोबा जयंती साजरी.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत गोरोबा काका कुंभार जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सौ काजल कोळी व उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी प्रतिमेचे पूजन केले तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनिल कंकरे, चंद्रकांत पाटील, राहुल नारखेडे पत्रकार जितेंद्र काटे, भोजराज कोळी यांनीही पूजन केले. या जयंतीच्या प्रसंगी चंद्रकांत शिरसाळे यांनी संत गोरोबा काका यांच्या जिवनाचा लेखाजोखा मांडला तसेच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विषद केली तसेच पत्रकार जितेंद्र काटे यांनी संत गोरोबा काका यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली व समाजाने आदर्श घ्यावा असे सांगितले. यावेळी कुंभार समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते राजू शिरसाळे, रविंद्र शिरसाळे, भागवत शिरसाळे, भोजू शिरसाळे,सागर शिरसाळे, योगेश शिरसाळे, गोटू शिरसाळे, संदीप शिरसाळे, आकाश शिरसाळे, गोकुळ शिरसाळे तसेच संत गोरोबा काका मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे वेळी संत गोरोबा काका कुंभार यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयास भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन शिरोळे व पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.