सुनसगाव ग्रामपंचायतीची स्ट्रिट लाईट बंदच ?

भुसावळ  – नुकत्याच झालेल्या दि २७ एप्रिल च्या चक्रीवादळामुळे येथील गावातील व शेती शिवारातील विज खांब पडल्याने मोठे नुकसान झाले आहे आता गावातील विजपुरवठा सुरू आहे तसेच वार्ड क्रमांक दोन मधील स्ट्रिट लाईट सुरू आहे मात्र वार्ड क्रमांक तीन व एक मधील भाग अंधारात आहे त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे . विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाचा सुध्दा विजपुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे याच कार्यालयात असलेल्या तलाठी कार्यालयात विजपुरवठा खंडित झाला आहे . गावाच्या चारही बाजूंनी विजपुरवठा खंडित झाला असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे . विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विजपुरवठा सुरू करण्यासाठी परिश्रम घेत आहेत परंतु लवकरात लवकर विज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh