सुनसगाव ग्रामपंचायत वार्ड रचना जाहीर ! अनुसूचित जाती व जमाती उमेदवारांचा वार्ड बदलला 

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमासाठी येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या मैदानावर ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी पंचायत समिती भुसावळ चे श्री सुरडकर साहेब यांनी वार्ड निहाय माहिती व जागांची माहिती दिली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ असल्याने तीन वार्डात प्रत्येकी तीन उमेदवार पुढीलप्रमाणे

वार्ड क्रमांक १ मध्ये अनुसूचित जमाती १ जागा ( स्री / पुरुष ),

सर्वसाधारण स्त्री २ जागा.

वार्ड क्रमांक २ मध्ये अनुसूचित जाती १ जागा ( स्री / पुरुष ) ,

अनुसूचित जमाती १ जागा स्री राखीव , सर्वसाधारण १ जागा ( स्री / पुरुष ).

वार्ड क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण १ जागा ( स्री / पुरुष ) , नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव १ जागा ,व सर्वसाधारण महिला राखीव १ जागा अशा प्रकारे आरक्षण आहे.

त्यामुळे नेहमी वार्ड क्रमांक ३ मध्ये असणाऱ्या अनुसूचित जाती व जमाती उमेदवारांचा हिरमोड झाला असून आता त्यांना वार्ड क्रमांक १ व २ मध्ये उडी मारावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

या ग्रामसभेच्या वेळी पंचायत समितीचे निवडणूक अधिष्ठाता श्री सुरडकर साहेब , तलाठी जयश्री पाटील , ग्रामसेविका प्रतिभा तायडे , विकासोचे चेअरमन सुदाम भोळे , पत्रकार जितेंद्र काटे , माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर पाटील , रविंद्र पाटील ,कोतवाल संजय गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ताजा खबरें