सुनसगाव – गोजोरा रस्त्यावर भिषण अपघात, दोन परप्रांतीय जागीच ठार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे – सुनसगाव रस्त्यावर असलेल्या सुदर्शन पेपर मील फाट्यावर दि. १० एप्रिल रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास मिनी ट्रक व मोटरसायकल यांचा अपघात होऊन परप्रांतीय दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. या बाबत प्रत्यक्ष पाहिलेली घटना अशी की रामसिंग भिलाला व मोटला भिलाला हे दोन्ही मोटरसायकल क्रमांक एम पी १० झेड बी ०४०१ ने शेताकडून सुनसगाव – गोजोरा रोडवर चढल्यावर सुनसगाव कडून गोजोरा कडे जाणाऱ्या ४०७ मिनी ट्रक क्रमांक एम एच १५ डी के १५६९ या वाहनाने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर  या अपघातात मोटरसायकल चक्काचूर झाली तर दोन्ही मृतदेह रस्त्यावर फेकले गेले.

या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम गमरीया भिलाला ह मु सुनसगाव यांनी फिर्याद दिली आहे की,दि.१० एप्रिल रोजी दुपारी शेताच्या रस्त्याने येऊन सुदर्शन पेपर मील कडे जाणाऱ्या रोड च्या समोर सुनसगाव – गोजोरा रोडवर चढत असताना सुनसगाव – गोजोरा रोडवर सार्वजनिक जागी मोटरसायकल व मिनी ट्रक यांचा अपघात होऊन या अपघातामुळे रामसिंग गमरीया भिलाला ( वय ४७ ) रा.कोटबैंडा पो. पिपलपोझा ता.झिर्निया जि. खरगोन मध्यप्रदेश व मोटला छितरीया भिलाला ( वय ४० ) रा.घर नं २३४ मसानिया फाल्या , ग्रामपंचायत उमारीया,ता.भगवानपुरा जि.खरगोन मध्यप्रदेश या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या बाबत माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप व पोऊनि पूजा अंधारे तसेच कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे पोलीस कर्मचारी दिपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, उमेश बारी व चालक सादिक शेख घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला आहे. मिनी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असल्याचे समजते.या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू क्रमांक ७३/२०२४ नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सुनसगाव पोलीस पाटील खुशाल पाटील, उपसरपंच एकनाथ सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते व सरपंच पती भोजराज कोळी, पत्रकार जितेंद्र काटे , गोजोरा येथील भागवत कोळी, सुदर्शन पेपर मील व शिवशक्ती व श्रीराम पेपर मील चे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी रुग्णवाहिका १०८ ला पाचारण करण्यात आले मात्र मृतदेह असल्याने १०८ रुग्णवाहिका परत गेली तसेच भुसावळ येथील दोन खाजगी रुग्णवाहिका बोलाविण्यात आल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटर भुसावळ येथे रवाना करण्यात आले यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला