सुनसगाव – बेलव्हाळ चौफुलीवरील दुकान फोडले ?

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथील बेलव्हाळ रस्त्यावर असलेल्या चौफुलीवर असलेले देवयानी टी सेंटर हे दुकान अज्ञात चोरट्यांनी दि ३० डिसेंबर च्या पहाटे पहाटे फोडले मात्र काहीही साहित्य चोरीला गेले नसल्याचे मालक भैय्या कोळी यांनी सांगितले. विशेष म्हणजे पहिल्यांदा दोन तीन वेळा हे दुकान जुन्या जागेत असताना फोडले होते त्यावेळी अनेक सामान चोरुन नेला होता.ही घटना घडली त्यावेळी मालक भैय्या कोळी हे दुकानाच्या पुढील भागात झोपलेले होते . चोरट्यांनी मागील बाजूस शेताच्या बाजूने पत्रा कापून दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला आहे तसेच वरील शेडचा पत्रा वाकविला आहे.
या चौफुलीवर मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या आहे मात्र तरीही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या परिसरातील व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh