सुसाइट नोट लिहुन दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगाव –  रिजन ऑफ माय डेथ आय हेट माय लाईफ असे सुसाईट नोटमध्ये मागितली आई वडिलांची माफी वाक्य भिंतीवर लिहून ठेवत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या कृष्णप्रिया उर्फ साक्षी अरुण पाटील (वय १५, रा. शास्त्रीनगर ) या विद्यार्थीनीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी विद्यार्थीनीने दोन पानांची सुसाईट नोट लिहून ठेवली होती ती पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये मी विचारांच्या प्रेशरमध्ये असून माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नका असे लिहीले आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करीत असतांना कृष्णप्रिया हीने सुसाईट नोटमध्ये वेळ देखील लिहून ठेवली आहे. शेवटच्या क्षणी ज्यावेळेस ती आत्महत्या करणार त्यापुर्वी तीने घरातील भिंतीवर रिजन ऑफ माय डेथ आय हेट माय लाईफ या वाक्यासह ११. ३० मिनिट अशी वेळ लिहून ठेवली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सतखेडा (ता. धरणगाव) येथील कृष्णाप्रिया शिक्षणासाठी जळगावला काका-काकूंसोबत मागील वर्षापासून राहत होती. आई-वडील लहान अपंग भाऊ आणि बहिणीसोबत गावी राहतात. शनिवारी ती काका-काकूंसोबत पेरणीसाठी गावी गेली होती. मात्र बुधवारी सकाळी ती एकटीच परत जळगावला आली. त्यानंतर तिने आपले जीवन संपवले.

कृष्णप्रिया उर्फ साक्षीने लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये तीने आई पप्पा मी तुमची ईच्छा पुर्ण करु शकणार नाही, मी जीवनाला कंटाळली असून माझ्या विचारांच्या प्रेशरमध्ये असून मला माफ करा असे म्हणत आणि आईवडीलांची तीने सुसाईट नोटमध्ये माफी मागितली आहे. पोलिसांनी ही सुसाईट नोट जप्त केली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh