साकळीसह परिसराला जोरदार वादळाचा तडाखा ;अनेक घरांवरची पत्रे उडाली, केळीबागा जमिनदोस्त 

साकळी ता.यावल (वार्ताहर) आज दि.४ रोजी दुपारच्या वेळी झालेल्या जोरदार वादळामुळे साकळीसह परिसरातील गावांना वादळाचा मोठा तडाखा बसलेला असून जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार वारा व वादळाने भयानक थैमान घातले होते.या वादळामुळे साकळीसह परिसरातील अनेक हेक्टर शेतामधील केळीबागा

जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.वादळाचा वेग एवढा मोठा होता की,मोठ-मोठी झाडे अक्षरशः गिरक्या घेत होती.या वादळामुळे शेतकरी धास्तावला आहे.वादळानंतर परिसरात हलक्या पावसाच्या सरी आल्या.

या बाबत सविस्तर असे की,आज दि.४ रोजी अकरा वाजेपर्यंत चांगलेच उन्ह तापत होते.त्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला व दुपारी सुमारे पाऊणेबारा वाजेपासून जोरदार वादळीवारा सुटला. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे मुळे धुळीचे लोट आकाशात उडू लागले होते. त्यानंतर काही क्षणातच वाऱ्याचा वेग वाढून वादळास सुरुवात झाली.जवळपास अर्धा ते पाऊण तास चाललेल्या वादळाने साकळी, शिरसाड,मनवेल,

थोरगव्हण, शिरागड, पिळोदा,नावरे,चुंचाळे,बोराळे सह परिसरातील गावांना मोठा तडाखा दिलेला आहे. या अचानक झालेल्या वादळामुळे अनेकांच्या घरावरची तसेच गुराढोरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाली तर साकळी येथे मुजूमदार कॉलनीत एका घरावर झाडाची फांदी पडली मात्र घरातील व्यक्ती शेतात गेले असल्यामुळे मोठा अनर्थ टळला तर भवानी पेठ भागातील प्रकाश सोनार यांच्या घरावर झाडांची मोठी फांदी पडली.तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली व झाडाच्या फांद्याही तुटून पडल्या. वादळामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या व अनेक ठिकाणी मुख्य विजवाहीनीला हानी झाल्यामुळे बराच वेळ वीज गेलेली होती.वादळाचा सर्वात मोठा फटका केळी बागांना बसला आहे.साकळीसह परिसरातील अनेक गावांतील शेतांमधील केळीबाग उन्मळून जमीनदोस्त झाल्या. तर काही भागात तर केळी बागांचे मळेच्या-मळे अगदी संपुर्ण उध्वस्त झालेले असून कोट्यावधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. वादळाची एवढी भयानक स्थिती होती की,शेतातून घरी येणाऱ्या शेतकऱ्यांना व मजुरांना चालतांना रस्ता दिसत नव्हता.आज रविवार रोजी साकळी येथील आठवडे बाजार वादळामुळे बाजातील लोकांची एकच तारांबळ उडाली होती. साकळीसह संपूर्ण परिसरातील नुकसानग्रस्त केळीच्या बागांचे संबंधित प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करण्यात यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार,खासदार या लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला