आदिवासी टोकरे, महादेव व मल्हार कोळी जमातीचा वरपाडा चौफुली शिंदखेडा येथे रास्ता रोको आंदोलन

महाराष्ट्र – आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाला अनुसूचित जमातीच्या हक्कापासून राजकीय दबावापोटी अनेक वर्षापासून वंचित ठेवले जात आहे त्यासाठी समाज बांधवांनी अनेक आंदोलने केलीत तरी शासनाने दखल घेतली नाही म्हणून मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आज सलग १४ दिवसांपासून अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलेले आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाचे प्रतिनिधी आमरण अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे तरी शासनाने अध्याप त्यांच्या मागण्यांची कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. म्हणुन आज दिनांक २३/१०/२०२३ वार सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजता वरपाडा चौफुली शिंदखेडा येथे आ. वा. सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे व भारतदादा ईशी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमातीच्या लोकांनी घोषणा दिल्या या नाकरत्या शासनाचे करायच काय खाली डोक वरती पाय, राजेनामा ध्या राजेनामा ध्या डॉ विजयकुमार गावीत राजेनामा ध्या, सुरेश धस कमेटीचा अहवाल लागु झालाच पाहिजे, इम्पीरियल डाटा एन्ट्री गॅझेट नुसार मंजुर झालेच पाहिजे व एक तिर एक कमान सारे आदिवासी एक समान अशा घोषणा देत सलग ००:३५ मिनीटे रास्ता रोको आंदोलन केले व रास्ता रोको आंदोलन ठिकाणी उपतहसिलदार राणे साहेब यांना शानाभाऊ सोनवणे, भारत ईशी सह सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले कि उपोषण करत्यांच्या मागण्या

1) महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी ,मल्हार कोळी यांच्या संदर्भात शासनाची अधिकृत प्रकाशाने, इम्पीरियल डाटा आणि जिल्हा गॅझेट, प्रख्यात मानवंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांचे दुर्मिळ ग्रंथ डेसिनिअल जनगणना अहवाल, संदर्भ पुस्तके सुप्रीम कोर्टाचे माधुरी पाटील, आनंद काटोले, आदिम गोवारी समाज, फुल बेंच मिलिंद कटवारे व इंद्रा सॉनी यावरून सिद्ध होते की महाराष्ट्रातील समुद्र काठावरील मच्छीमार व सोनकोळी यांचा समावेश ओ.बी.सी. किंवा एस.बी.सी. मध्ये होतो उर्वरित सर्व कोळी हे टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी या आदिवासी ग्रुपमधील आहेत म्हणून शासनाने तात्काळ तसा आदेश काढावा

2) अनुसूचित जमातीचे दाखले निर्गमित करण्यासाठी २३ जुलै २०१० रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी कल्याण समितीने मा. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली शासनाला ज्या शिफारसी केल्या आहेत त्या तात्काळ लागू कराव्यात.

3) अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी. तसेच आदिवासी टोकरे कोळी ,महादेव कोळी ,मल्हार कोळी व इतर आदिवासीकडे काही कारणास्तव लेखी पुरावा उपलब्ध नसेल व त्या उमेदवाराचा दावा असेल की मी खरा आदिवासी आहे तर त्याचे तसे प्रतिज्ञापत्र घेऊन किंवा त्याची डी. एन. ए.चाचणी घेऊन त्याला जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र द्यावे.

4) खोटे दाखले देणाऱ्या उपविभागीय अधिकारी किंवा तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असा कायदा आहे तसाच कायदा जर उपविभागीय अधिकारी किंवा तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांकडून खऱ्या आदिवासींना जाणीवपूर्वक आपल्या जामातीच्या दाखल्या पासून वंचित केले गेले असेल तर त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हा दाखल करावा.या मागण्या संदर्भात आदिवासी आमदार व आदिवासी मत्र्यांशी बैठक लावावी असे शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले व जर लवकरात लवकर उपोषण करत्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी एकविरा देवी देवपुर धुळे पासून तर मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा काढली जाणार व जो पर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तो पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष सुरुच राहणार त्यावेळी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे माजी उपजिल्हा अध्यक्ष भारत दादा ईशी, पवन सोनवणे, वासुदेव चित्ते, एकनाथ सावळे, बबलु कोळी, सुनील मगरे, मनोज निकम, रावसाहेब सौंदाणे सरपंच, रविंद्र मोहणे, रावसाहेब ईशी, छोटू साळुंखे, सतिष कोळी, युवराज कोळी, भरत कोळी, मनोहर आखडमल सरपंच, भुषण सोनवणे, हेमंत कोळी, दिपक श्रीराव, प्रविण बोरसे, ज्ञानेश्वर कोळी, पावबा बोरसे, विष्णु कोळी मुकेश ईशी, महारु कोळी, गौतम कोळी, रमेश बागूल, गोपाल कोळी, शांताराम कोळी, योगेश सोनवणे, गोविंद कोळी, विठ्ठल कोळी, आनंदा कोळी, अनिल कोळी कुंदन कोळी, इंदलाल कोळी, ब्रिजलाल कोळी, सागर कोळी , चंद्रकांत कोळी, मनोज कोळी, बन्सीलाल कोळी, अभय ईशी, सुकदेव कोळी, प्रकाश कोळी, श्याम कोळी , भाईदास कोळी, डिगांबर कोळी, गणेश कोळी, किरण कोळी, राहुल बोरसे, विनोद कोळी, दिपक कोळी, समाधान कोळी सह शिंदखेडा तालुक्यातील अनेक आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाज बांधव उपस्थित होते

jalgaonsandesh

jalgaonsandesh