राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई -राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. निवडणुक आयोगाचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

राज्यात 17 जिल्ह्यातील राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्या होत्या. त्यांना आज स्थगिती निवडणुक आयोगाकडूनच देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने 8 जुलै रोजी नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा यासह एकूण 17 जिल्ह्यात 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका घेण्यात येणार होत्या.

jalgaonsandesh

jalgaonsandesh