विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी उलटली; वीस विद्यार्थ्यांसह अन्य तिघे जखमी

राहुरी तालुक्यातील कोळवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन संगमनेरकडे निघालेली परिवहन महामंडळाची एसटी बस पिंपरणेनजीक आज सकाळी उलटली. या अपघातात वीस विद्यार्थ्यांसह अन्य तिघे जखमी झाले. जखमींवर संगमनेरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या बसमधून एकूण 48 प्रवासी प्रवास करीत होते. बसचा ऍक्सल रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एसटी रस्त्याकडेला खड्डय़ात उलटली. जेथे अपघात झाला त्यापासून अगदी काही फुटांवर विद्युत पुरवठा करणारे रोहित्र होते. सुदैवाने बसचा अपघात त्यापुढे काही अंतरावर घडल्याने मोठा अनर्थ टळला.

या अपघातानंतर ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य करीत बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. तालुका पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला होता. याबाबत अद्यापि पोलीस दप्तरी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

संगमनेर तालुक्यातील म्हैसगाव येथे मुक्कामी थांबणाऱया बसमधून डिझेल चोरीचे प्रकार घडल्याने ही बस सध्या राहुरी तालुक्यातील कोळवाडी येथे मुक्कामी थांबते. आज सकाळी सहा वाजता संगमनेरच्या दिशेने निघालेली एसटी बस पिंपरणेनजीक पोहोचली. यावेळी बसमध्ये 48 प्रवाशांसह एकूण 50 जण होते. पिंपरणेत येताच बसचा ऍक्सल रॉड तुटल्याने ती अनियंत्रित झाली आणि रस्त्याकडेला उलटली.

बस उलटल्याच्या आवाजाने आसपास राहणाऱया ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात 20 विद्यार्थ्यांसह अन्य तीन प्रवासी जखमी झाले. काही विद्यार्थिनींच्या हाताला गंभीर मार लागल्याने त्या जायबंदी झाल्या आहेत. जखमींना तातडीने संगमनेरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती प्राप्त होताच, तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, हवालदार संपत जायभाय व ओंकार शेंगाळ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

जखमींची नावे

विकास ढमाजी लांबहाते, तुकाराम बाबासाहेब दातीर, पितांबर उत्तम भुसारी (तिघेही रा. खरशिंदे), रेश्मा सुखदेव भुतांबरे, अर्चना बाळासाहेब दातीर, आझम ज्ञानदेव दातीर, पूजा दातीर, तृप्ती दिलीप दातीर, साक्षी रामराव कापडी (सर्व रा. खांबे), अनुराधा रमेश गायकवाड (रा. पानोडी), मयुरी शरद मुन्तोडे (रा. शिबलापूर), राहुल श्रावण जगताप, जयेश शिवाजी वर्पे (दोघेही रा. कनोली), कल्याण केशव घुगे, जिज्ञासा बाळू कांगणे, अस्मिता सुनील कांगणे, तनिष्का सागर कांगणे (सर्व रा. हंगेवाडी), सतीश लक्ष्मण सानप (रा. खळी), श्रृतिका अमोल खरात (रा. मालुंजे) व सानिका नागरे (रा. ओझर बु.) या 20 विद्यार्थ्यांसह बाजीराव गोविंद लहांगे (वय 82, रा. पिंपळगाव माथा), बसचे वाहक सोमनाथ सोपान बर्डे (रा. ओझर बु.) व चालक मनोहर गागरे (रा. वरवंडी) असे एकूण 23 जण जखमी झाले आहेत. उर्वरित 27 जणांना किरकोळ मुका मार लागल्याने त्यांना अपघातस्थळावरूनच घरी पाठवण्यात आले.

तिघींचा पेपर बुडाला

या अपघातात जखमी झालेल्या खांबे येथील तृप्ती दिलीप दातीर या विद्यार्थिनीला आज नगर येथे जिल्हा परिषदेचा पेपर द्यायचा होता. त्यासाठी ती संगमनेरात येऊन नगरकडे जाणार होती, तर ओझर बु. येथील सानिका नागरे या विद्यार्थिनीचाही आज व्यवस्थापन शास्त्राचा पेपर होता. अपघातात ती जखमी झाली. तिच्या हाताला दुखापत झाल्याने आजच्या पेपरला तिला मुकावे लागले. अपघातात उजवा हात जायबंदी होऊनही तृप्ती दातीर या विद्यार्थिनीने नगर येथे जाऊन आज दुपारी 3 वाजता होणारी परीक्षा देण्याचा मनोदय बोलून दाखवला.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला