स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केल्याबद्दल त्यांचा तेली समाजातर्फे डॉ लिलाचंद वाघ यांचा सत्कार… 

हेमकांत गायकवाड

चोपडा: -डॉ. लिलाचंद अरुण वाघ यांनी कोरोना काळात रुग्णांची मनोभावे सेवा केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केल्याबद्दल त्यांचा तेली समाजातर्फे सत्कार करण्यात आला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के .डी .चौधरी यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर ,श्रीराम नगर ,चोपडा येथे चातुर मासानिमित्त आयोजित हरिपाठात आरती प्रसंगी त्यांचा हा गौरव करण्यात आला. यावेळी शिवाजी देवराम चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ रूपाबाई शिवाजी चौधरी तसेच रामकृष्ण पोपट चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ दिपाली रामकृष्ण चौधरी तसेच डॉक्टर लीलाचन्द वाघ यांचे शुभ हस्ते आरती करण्यात आली. यावेळी प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ह. भ. प. गोपीचंद महाराज यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ह भ प ज्ञानेश्वर राजाराम नेरकर ह भ प प्रकाश श्रावण चौधरी ह भ प विठ्ठल शिंपी ,जितेन्द्र प्रकाश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.