सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी गाणार

नांदेड -नसानसातून वाहणाऱ्या देशभक्तीच्या उर्मीस चेतना देणारा सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम काल रात्री शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडला. मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या १३ वर्षापासून होत आहे.

महाराष्ट्रात गाजलेली कलावंत रविंद्र खोमणे, मनव्वर अली, मालविका दिक्षीत आणि पत्रकार विजय जोशी यांच्या एकापेक्षा एक देशभक्तीपर गितांनी हा कार्यक्रम संपन्न झाला. काल सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत हे उपस्थित होते.

ताजा खबरें