पाचपावली भागातील लष्करीबाग येथे शेकोटीत तारपीन टाकल्याने भडका उडून भाजल्याने ५४ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजू नारायण अंबादे असे या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ डिसेंबरला घडली होती.
संजू यांनी घराच्या अंगणात एका लोखंडी घमेल्यात चिंध्यांची शेकोटी पेटवली. यावेळी हात शेकत असताना, त्यांनी पेटलेल्या चिंध्यांवर टारपिन टाकले. त्यामुळे भडका उडाला. या प्रकाराने संजू अंबादे यांच्या कपड्यांनी पेट घेतला.
त्यात ते भाजले गेले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी (ता.२३) उपचारादरम्यान रात्री दहा वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रोहित संजू अंबादे (वय २५) यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करत, तपास सुरू केला आहे.