शुभमन गिलची राजभिषेक! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार घोषित

शनिवार, 24 मे 2025, हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहून गेला. शुभमन गिल या २५ वर्षीय तरुण खेळाडूचा भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी अधिकृत राजभिषेक झाला. बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी नवा संघ जाहीर करताना ही ऐतिहासिक घोषणा केली.

या नियुक्तीमुळे भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. नुकत्याच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले आधुनिक दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी आता शुभमन गिलच्या खांद्यावर आली आहे. निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांनी ही निवड अधिकृतपणे जाहीर केली.

शुभमन गिल – नव्या युगाचा नेता

शुभमन गिलची ही नेमणूक अचानक नव्हे. तो पूर्वीपासूनच भारताच्या भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहिला जात होता. गिलने टी२० सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली आहे. या वर्षी गुजरात टायटन्स आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून उर्वरित काही सामन्यांतही चांगला परफॉर्मन्स अपेक्षित आहे.

आयपीएल आणि कसोटी क्रिकेटमधील फरक लक्षात घेता, गिलचा शांत आणि परिपक्व नेतृत्वशैलीमुळे त्याचे संघसहकारी आणि प्रशिक्षक त्याच्यावर भरवसा ठेवत आहेत.

कसोटी कारकिर्दीचा आढावा

गिलने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीद्वारे कसोटी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ३२ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने १,८९३ धावा केल्या आहेत. त्याचा सरासरी ३५.०५ आहे आणि त्याने पाच शानदार शतके ठोकली आहेत.

त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि मैदानावरील सजगतेमुळे तो भारताच्या भविष्यातील आधारस्तंभ ठरतो आहे. यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत यांच्यासारख्या नव्या खेळाडूंसोबत गिलकडून आगामी दशकात भारतीय कसोटी संघाच्या यशस्वी वाटचालीची अपेक्षा आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका – नव्या पर्वाची सुरुवात

भारताची इंग्लंड दौरा ही केवळ आणखी एक परदेशातील मालिका नाही. ती एक नव्या पर्वाची नांदी आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या चक्राची ही सुरुवात इंग्लंडच्या घरच्या मैदानावर होणार आहे.

ही पाच कसोटी सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहेत:

  1. हेडिंग्ले, लीड्स

  2. एजबस्टन, बर्मिंगहॅम

  3. लॉर्ड्स, लंडन

  4. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

  5. द ओव्हल, लंडन

या मालिकेत विजय मिळवणं म्हणजेच नव्या नेतृत्वाला यशस्वी सुरुवात मिळवणं. भारताचा कसोटी संघ सध्या परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे आणि गिलच्या नेतृत्वात तो नव्या उंचीवर पोहोचू शकतो.

भारताचा इंग्लंडविरुद्ध कसोटी संघ:

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

या संघात अनुभवी खेळाडूंसोबत काही नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. यामुळे संघाच्या संतुलनात नवा जोश पाहायला मिळतो.

गिलवर अपेक्षांचा भार आणि उज्वल भविष्याची आशा

शुभमन गिलच्या नेतृत्वाची परीक्षा आता इंग्लंडच्या कठीण वातावरणात होणार आहे. भारतीय संघावर कसोटी क्रिकेटमधील महत्त्व टिकवण्याची जबाबदारी आहे. रोहित आणि कोहलीसारख्या दिग्गजांची जागा घेणं सोपं नाही, पण गिलमध्ये तो आत्मविश्वास आणि दृष्टिकोन आहे.

गिलची शांत संयमी वृत्ती, खेळावरील जाण आणि फलंदाजीतली सातत्य ही त्याची ताकद आहे. इंग्लंडमधील कठीण परिस्थितीत तो कसा टिकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताजा खबरें