प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथील श्री राम मंदिर येथे समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने अयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिर उभारणीच्या निमित्ताने दि १५ ते २२ जानेवारी या कालावधीत श्री रामकथा पारायण सोहळा आयोजित केला असून आपल्या अमृतमय वाणीतून हभप सुरेश महाराज जावळे तळवेलकर यांच्या वाणीतून कथा निरुपण सुरू आहे. यात सकाळी काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते ५ कथा संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० किर्तन असे नियोजन असून हभप श्रीकृष्ण महाराज गोजोरे, हभप संजय महाराज चितोडा यांची किर्तने झाली असून दि १७ रोजी दिपक महाराज शेळगाव, १८ रोजी गणेश महाराज गोजोरे, १९ रोजी अलकाताई महाराज जळगाव, २० रोजी सीमाताई नेहेते महाराज भुसावळ, २१ रोजी जितेंद्र नेमाडे महाराज भुसावळ आणि दि २२ रोजी शरद महाराज जळगाव यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
महाप्रसाद दि.२२ रोजी दुपारी २ ते ५ आणि संध्याकाळी ६ ते ७ दिंडी सोहळा भारुड व रात्री ८ ते १० काल्याचे किर्तन होणार असून परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोजोरे ग्रामस्थांनी केले आहे.