वांजोळा येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वांजोळा येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संत ज्ञानेश्वर भजनी मंडळी व महिला भजनी मंडळ यांच्यातर्फे हनुमान जन्माचे अभंग गाऊन हनुमान चालीसा पठण करून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच गाव पिपरी शिवार पाच पांडव येथे हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी हनुमान भक्तांनी पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांनी हनुमान चालीसाचे पठण करून मंदिरामध्ये वाघुर नदीच्या काठावर असलेले जागृत हनुमान मंदिर पाचपांडव पिंपरी शिवार येथे सुद्धा काही हनुमान भक्तांनी भंडाऱ्याचे कार्यक्रमाचा आयोजन केले होते तसेच हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी देखील मंदिरावर विद्युत रोषणाई लावून हनुमान चालीसांचे लाऊडस्पीकरच्या साह्याने अवघे पिंपरी शिवार पाचपांडव परीसरातील मंदिर दुमदुमून गेलेले होते तसेच वांजोळा येथे हनुमान मंदिरावर भजनी मंडळाच्या सहकार्याने हनुमान चालीसा पठण करून व हनुमान जन्माचे अभंग गाऊन भजनी मंडळ गायनाचार्य सोमा धनगर यांनी हनुमान जन्माचे अभंग गाऊन व गोविंदा सावळे मृदंग वादक, विणेकरी तुकाराम धनगर व युवराज मोरे, नितीन पाटील, रवींद्र मोरे, भीमराव कोळी, पंढरी पाटील, पत्रकार किशोर सावळे व मुकुंदा सावळे यांनी परिश्रम घेत हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.