श्री साई गजानन सेवा मंडळ संचलित अमळनेर ते शेगाव पायीवारी उत्साहात पार ! 

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – श्री साई गजानन सेवा मंडळ संचालित आयोजित अमळनेर ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारकऱ्यांचे प्रस्थान मोठेबाबा मंदिर ढेकू रोड अमळनेर येथून श्री एस एम पाटील यांच्या हस्ते महापूजा होऊन वारकऱ्यांचे प्रस्थान झाले. टाळ वीणाचा गजरकरत, गण गण गणात बोते चा मंत्र जपत वारकरी निघाले, रस्त्यात भक्तगणांनी सडा रांगोळ्या टाकून पालखीचे स्वागत केले स्पेशल राणा बैंड चे पथक थेट शेगांव पर्यंत असल्याने वारीचे विशेष आकर्षण राहिले.शिरीष दहाळे सरा कडे आरती पूजा करुन, गोडशेव प्रसाद वाटप करण्यात आला पुढे पालखी नामदार श्री अनिल पाटील यांच्याकडे सालाबादप्रमाणे पालखी नेण्यात आली त्या ठिकाणी पालखी पूजा व आरती करण्यात आली. दर्शन सोहळा पार करून पुढे भगवा चौकात वारी प्रमुख शिवाजी मोहन पाटील यांच्याकडे पालखी सोहळा पोहोचला तेथे विधिवत पूजा करण्यात आली व पालखी सोहळ्यास मान वंदना देण्यात आली. नंतर विजय मारुती गजानन महाराज भेट करण्यात आली नतर वारकरी सराफ बाजारातून संत सखाराम महाराजांचे दर्शन व भेट करून पुढे धरणगाव रस्त्याला लागले. सती माता मंदिरावर वारकऱ्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. सुशील जैन यांनी वारकऱ्यांसाठी नाश्ता दिला वारीचे संचलन विठ्ठल पाटील व मंडळ करीत होते नंतर पुढे टाकरखेडे येथे माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी चहापान केले तर भोणे फाट्यावर माजी पंचायत समिती उपसभापती श्री अशोक बाबूलाल पाटील यांनी वारकऱ्यांसाठी चहा नास्ता. दिला त्याप्रमाणे वारी प्रमुख शिवाजीराव पाटील यांचा सत्कार केला. वारी मुक्कामाला पिम्प्रि गावी होती तर दुसर्या दिवसी पालधि गावी राकेश विश्वासराव चव्हाण यानी पालखीचे पूजन करुन वन्दना दिली. पुढे वारी मार्गस्थ होत असताना दुपारचा महाप्रसाद जितेंद्र मधुकर जगताप यांच्याकडे होता त्या ठिकाणी महा सत्संग घेण्यात आला जळगाव नगरीत वारीचे जोरदार स्वागत झाले रात्रीचा मुक्काम पद्मसिद्धी ऑटो या ठिकाणी संजय रामदास खैरनार यांच्याकडे होता सत्संगात त्यांचे मित्र परिवाराने प्रत्येक वारकऱ्यांसाठी टॉवेल वाटप केली व सर्व परिवाराने सत्संगात सहभाग नोंदवला पुढे दुपारच्या महाप्रसाद गोजरे ऑटो फॅक्टरीवर सुधाकर महाजन यांनी दिला वारीत भजन नामस्मरण यांचा उल्लेख करत,वारी भानखेड्याच्या गजानन महाराज मंदिरावर पोहोचली श्री सुभाष महाराज यांनी वारकऱ्यांसाठी प्राकृतिक, आयुर्वेदिक माहिती दिली वारीचे महत्त्व पटवलं व वारी प्रमुख शिवाजी पाटील विठ्ठल पाटील दहाले सर त्यांनी व्यसनमुक्तीचा आव्हान केलं त्या कार्यक्रमात तीन जणांनी तंबाखू व गुटखा सोडला तर तीन जणांनी दारूचे व्यसन सोडल्याचं सर्व वारीसमोर सांगितलं. पुढे वारी बोदवडला गजानन महाराजांच्या मंदिरात पोहोचली राजेश किसनजी नानवाणी यांनी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलं होतं त्या ठिकाणी वारीतील निवडक भाविकांचा देखील सन्मान करण्यात आला निस्सीम गजानन भक्त यमू ताई आवकाळे यांचे कायम मोलाचे सहकार्य असते, श्री साई गजानन मंडळाचे वतीने यमु ताई अवकाळे ह्या तीर्थयात्राला असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.श्री राजेशजी नानवाणी यांचा यांच्या आई सोबत सपत्निक सन्मान मंडळांनी केला वारी पुढे मार्गस्थ झाली. जांभूळ धाब्यागावी जवरे पहिलवान यांनी गावात पालखीचे आयोजन केलं वीणा धारी व वारी प्रमुख यांचं पाद्यपूजन करण्यात आलं अशा पद्धतीने वारी नांदुरा येथे पोहोचली या ठिकाणी प्रशांत जामोदे यांनी भोजन व निवास व्यवस्था मंगल कार्यालयात केलेली होती. जामोदे ताई यांनी देखील सत्संगात सहभाग नोंदवला अखेर वारी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचली या ठिकाणी येथे भुस्कटीचा मळा या ठिकाणी वारकऱ्यांना कपडा प्रसाद देण्यात आला त्यानंतर परिक्रमा होऊन माऊलींच्या दर्शन होऊन संस्थांनचा महाप्रसाद वारकऱ्यांनी घेतला. वारीत सुमारे 350 भाविक सामील असल्या बाबतचा खुलासा विठ्ठल पाटील व वारी प्रमुख एस एम पाटील आप्पांनी, केला वारी यशस्वीतेसाठी मन्डलाचे खंदे कार्यकर्ते- मंडलाचे सचिव विठ्ठल भाऊराव पाटील, शिरीष डहाळे सर, सैंदाणे सर, आर व्ही पाटील, जितेंद्र बोरसे,रमाकांत नामदेव पाटील, गुलाब मुरलीधर पाटील,मुकेश साळुंखे,पी एम रावसाहेब,सुखदेव पाटील, समाधान पाटिल, डी ई पाटील,तुळशीराम आण्णा, ईश्वर पाटील, सुरेश पाटील, अशोक ईसे सर,महाले सर, योगेश बाग, सुभाष साळुंखे, राजेंद्र सोनवणे, वाल्मीक मराठे, गुणवंत पवार, एस डी सोनार आप्पा,यांनी परिश्रम घेत माऊलीचा पालखी सोहळा शेगाव येथून सुखरुप घरी परतला मंडळाचे अध्यक्ष शिवाजी मोहन पाटील, उपाध्यक्ष शिरष डहाळे, चिटणीस विठ्ठल पाटील सर्व मंडळाने यानी सर्व वारकरी बांधवचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

jalgaonsandesh

jalgaonsandesh