13 मे 2025 रोजी जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील शोकल केलर भागात भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन केलर’मध्ये लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या गटाचा, ‘The Resistance Front (TRF)’ चा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी शाहिद कुट्टेय याला ठार करण्यात आले. या कारवाईत आणखी दोन दहशतवादी देखील ठार करण्यात आले.
भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटला मिळालेल्या अचूक गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम सुरु करण्यात आली होती. शोकल केलर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च अँड डेस्ट्रॉय ऑपरेशन सुरू केले.
मोहीम दरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला आणि जोरदार चकमक सुरु झाली. भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरात तीन कट्टर दहशतवादी ठार झाले.
शाहिद कुट्टेय कोण होता?
शाहिद कुट्टेय TRF चा प्रमुख असून, 08 एप्रिल 2024 रोजी पहलगाममधील डॅनिश रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार होता. या हल्ल्यात दोन जर्मन पर्यटक आणि एक ड्रायव्हर जखमी झाले होते.
18 मे 2024 रोजी शोपियानमधील हीरपोरा येथे भाजप सरपंचाची निर्घृण हत्या करण्यामागेही कुट्टेयचा हात होता.
तसेच 03 फेब्रुवारी 2025 रोजी कुलगाममधील बेहिबाग भागात टेरिटोरियल आर्मीच्या जवानाची हत्या करण्यात कुट्टेयचा सहभाग असल्याचा संशय आहे.
तसेच 03 फेब्रुवारी 2025 रोजी कुलगाममधील बेहिबाग भागात टेरिटोरियल आर्मीच्या जवानाची हत्या करण्यात कुट्टेयचा सहभाग असल्याचा संशय आहे.
दहशतवाद्यांची ओळख:
या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये TRF चे आणखी दोन कट्टर सदस्य होते. यापूर्वी जम्मू-कश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांचे स्केच आणि माहिती प्रसिद्ध केली होती.
त्यामध्ये खालील तीन दहशतवाद्यांचा समावेश होता:
-
हुसैन थोक्कर – अनंतनागचा स्थानिक रहिवासी
-
अली भाई ऊर्फ तल्हा भाई – पाकिस्तानी मूळचा LeT सदस्य
-
हाशिम मूसा ऊर्फ सुलेमान – पाकिस्तानी दहशतवादी
या तिघांवर प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते.
‘ऑपरेशन केलर’ – भारतीय लष्कराचे आणखी एक यशस्वी मिशन:
शोपियान जिल्ह्यातील शुकरू केलर या अतिदुर्गम भागात दहशतवाद्यांची हालचाल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात जोरदार शोधमोहीम हाती घेतली.
दाट जंगलांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांचे मृतदेह दिसून आले असून, त्यांच्या शवांची ओळख लवकरच करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरनंतरचा मोठा धक्का:
ही कारवाई भारताने अलीकडेच यशस्वीपणे पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर झाली आहे. या मोहिमेदरम्यान भारताने पाकिस्तानमधील जैश आणि लष्कर ए तोयबाच्या तळांवर प्रिसीजन स्ट्राईक करून 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
ज्यामध्ये बहावलपूरमधील जैशचे मुख्यालय आणि मुरिदकेमधील लष्करचा प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले होते.
सुरक्षा दलांची सजगता आणि गुप्तचर यंत्रणांचे कौतुक:
‘ऑपरेशन केलर’मध्ये मिळवलेले यश हे भारतीय गुप्तचर यंत्रणांची अचूक माहिती, सैन्य दलांचे समन्वय आणि तंत्रशुद्ध कार्यवाहीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.