शेतकरी आणि कामगार मागास का? शिवराम पाटील

जळगाव – :शेतकरी आपल्या हिताचे काम करणारा ओळखत नाही.सर्वाधिक उत्तम शेतकरी नेता शरद जोशी होते.त्यांना डावलले.
आता राजू शेट्टी आहेत.तरीही निवडणुकीत हरवले.
शेतकरी आणि कामगार हे कष्ट करतात.पण तितका अभ्यास करीत नाहीत.राजकिय आणि आर्थिक अभ्यास तर मुळीच करीत नाहीत.त्यामुळे आपले हित कोण करू शकतो,हेच ओळखत नाहीत.
कोणत्याही काळात, कोणत्याही राज्यात बुद्धीमान, ज्ञानवंत, नीतिमान लोक प्रगत असतात.या तिन्ही बाबतीत शेतकरी आणि कामकरी खूप मागे पडतो.काळ पुढे पडतो.त्या काळासोबत शेतकरी आणि कामगार धावू शकत नाहीत.
शेतकरी आधिकतम ग्रामीण भागात राहातात.जो कोणी नोकरी करतो.चोरी करतो.गावात येऊन तरूणांना दारू पाजतो.मटन खाऊ घालतो.तोच त्यांना आवडतो.जो कोणी नोकरी करतो.प्रामाणिक पगार घेतो.गावात येतो.दारू मटन न देता शहाणपणाच्या दोन गोष्टी सांगतो.तेंव्हा तरूण म्हणतात,हे आम्हाला समजत नाही.डोक्यावरून जाते.मेंदूचे खोबरे करू नका.काही खायचे प्यायचे सांगा.फुकटचे तत्वज्ञान नको.म्हणून राजकीय नेते सुद्धा भाषणाला श्रोते आणण्यासाठी स्वताची किंवा भाड्याची वाहने पाठवतात.मंडप टाकून जेवण देतात.तेंव्हा तेथे आधिकतम शेतकरी आणि कामगार हजेरी लावतात.नोकरवर्ग आणि व्यापारी, कारखानदार लबाडांची भाषणे ऐकत नाहीत.ते चोरांकडून मिळणारे जेवणावर अवलंबून राहात नाहीत.
कामगार लोक आधिकतम शहरातील बाहेरच्या भागात दाटीवाटीने राहातात.तेथे रस्ता पाणीची सुविधा नसते.तेथे निवडणुकीत उमेदवार येतो.एका मोहल्ला ला एक बोकड,बोगण,ड्रम देतो.कामगार त्याचा लाभ घेतात.त्या हरामखोराची स्तुती करतात.त्याचेकडून पैसे घेतात.त्याला मतदान करतात.तो निवडून आला कि पांच वर्षे यांचे वाट्याचे रस्ते,पाणी ,गटार,वीज असे परस्पर हजम करतो.अधूनमधून दारूसाठी रोख पैसे देतो.गणपती उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती ला देणगी देतो.त्याचे बैनर लावतो.कपाळावर टिळा,गळ्यात माळा,खुरटी दाढी,चार पांच अंगठ्या.लोक त्याला देव समजू लागतात.तो नाच गाण्याचा इंतजाम करतो.मंद लोक धुंद होऊन नाचतात.यालाच ते जिवन समजतात.यालाच ते राजकारण समजतात.यालाच ते सांस्कृतिक कार्यक्रम समजतात.सांगा ,कसा होईल विकास?कोण करील विकास?ज्यांना विकासाची माहिती आणि महत्व नसेल तर!
जळगाव शहरातील अशा दाट वस्तीत आधिकतम गुंड, गुन्हेगार निवडून येतात. तेच महापौर उपमहापौर बनतात.कदाचित येथील लोकांची तिच पसंती असावी.एक भुमाफिया गर्वाने सांगतो.मी जळगाव मधील कोणत्याही वार्डात निवडून येतो.मुद्दाम वार्ड बदलतो.पांच वर्षं मी त्या वार्डात जात नाही.मी लोकांना ओळखत नाही.लोक मला ओळखत नाहीत. तशी गरजच पडत नाही.तरीही उमेदवारी करतो.मतदार यादी घेतो.माणसे कामाला लावतो.ते घरोघरी पैसे वाटप करतात.माझे नांव व चिन्ह हातात सोपवतात.मी एखादा चक्कर टाकतो. तोंड दाखवतो.हात जोडतो.मी सहज निवडून येतो.याचे सहज निवडून येण्याचे कारण मतदारांच्या मुर्खपणात दडलेले असते.
मी जळगाव शहरात राहातो.जोशी पेठ,भवानी पेठ,पोलन पेठ, गणेश कॉलनी,रींग रोड , आदर्श नगर भागात रस्ते गुळगुळीत आहेत.पण वाघनगर,हरिविठ्ठनगर,आशाबाबानगर , खोटेनगर, शिवाजीनगर, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी मधे रस्ते बनलेच नाहीत.बनवलेच नाहीत.कर तर सर्वच रहिवासी भरतात.निधी तर सर्वच वार्ड साठी मिळतो.तर मग,या कॉलनीतील रस्ता,गटार साठीचा निधी जातो कुठे? नगरसेवक परस्पर हजम करतात.तेच पैसे गणपती उत्सव, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती ला देतात.तेच पैसे निवडणुकीत मताचे वाटतात.या कॉलनीतील रहिवाशांना कधीच प्रश्न पडत नाही कि,हा देणगीचा पैसा आणतो कोठून? नगरसेवक किंवा आमदाराने शेत,घर विकले का?हे कळले पाहिजे,इतकी तर सुधबुध पाहिजे कि,हा पैसा माझ्या कॉलनीतील रस्त्यांचा ,गटारीचा बांधकामाचा आहे.तो विकासासाठी वापरण्याऐवजी उत्सव साठी दिला आहे.खाऊनपिऊन नाचगाण्यासाठी दिला आहे.
नोकरीत आरक्षण पाहिजे.राजकारणात आरक्षण पाहिजे.दिले.म्हणून या वस्तीमधून आरक्षित सदस्य निवडून आले.पण ते सुद्धा इतर चोरांसोबत लुटीत सामील झाले.नोकरीत आरक्षण पाहिजे.दिले.आता जळगाव महापालिका आयुक्त विद्या गायकवाड आहेत.यांना कधीच वाटत नाही कि,आपली माणसे अजून वंचित का?आपण आरक्षणाचा लाभ घेतला तर थोढा लाभ आपल्या बांधवांना,वंचितांना का मिळवून देऊ नये?तशी उपरती येत नाही.भुकेला माणूस गरजेपेक्षा जास्त जेवला कि,तो इतर भुकेले लोकांची भूक विसरतो.इतरांच्या भुकेची झळ आणि कळ त्याला जाणवतच नाही.
ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी भागातील कामगार असेच कोणाचे धनदांडग्यांचे बळी ठरतात.जळगांव जिल्ह्यातील असे अनेक सरपंच व सदस्य अतिक्रमण व अपहार कारणे अपात्र झालेत.अजूनही अनेक तक्रारी कलेक्टरकडे पडून आहेत.सांगा,असे सदस्य आणि सरपंच कोण निवडून देतो?हेच शेतकरी.कसे निवडून देतात?पैसे घेऊनच.
माणसाला मन असते.बुद्धी असते.अभ्यास करून किंवा अनुभवाने तो मत बनवतो.तसे बनवलेले मत त्याने पसंतीच्या उमेदवाराला टाकले पाहिजे.पण नाही.मत म्हणजे पांचशे रूपयाचे असेट.दहा दिवस खाण्यापिण्याचे कुपन.असा समज शेतकऱ्यांचा असतो.असा समज कामगारांचा असतो.तो समज दूर झाला पाहिजे. आण्णा हजारे सारखे अनेक समाजसेवकांनी तसा प्रयत्न केला.आजही चालू आहे.पण शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या गुळगुळीत फळ्यावर समाजसेवकांचा खडबडीत खडू उमटतच नाही.
माझ्यासोबत असणारे सहकारी विचारतात.काका,आपली संघटना मोठी का होत नाही? मी म्हणतो, माझे काम आवडते.स्तुती करतात.फोनवर बराच वेळ बोलतात.पण माझ्या स्तनांतून दूध निघत नाही म्हणून मला सोडून निघून जातात.माझे अनेक पक्षातील लोक संपर्कात आहेत.पण पक्षात घेत नाहीत.म्हणतात,काका तुम्ही आले कि आमचे धंदे बंद पडतील.आमचे राजकारण संपेल.तुम्ही सामनेवाले नेत्यांच्या भ्रष्टाचार विषयी बोलतात तेव्हा आम्हाला बरे वाटते.आम्ही जवळ येतो.पण तुम्ही आमच्या नेत्यांच्या भ्रष्टाचार विषयी बोलतात तेंव्हा आमची अडचण होते.तेंव्हा आम्ही तुमच्या पासून दूर जातो.त्यापेक्षा तुम्ही दुरूनच चांगले.तुमचे आमचे संबंध चांगले असावेत,इतकीच ईश्वर चरणी प्रार्थना.आम्ही तुम्हाला मानतो.नमस्कार करतो.इतके प्रेम असू द्या.
माझा विश्वास आहे कि,चोरी, अपहार न करता राजकारण करता येते.पण तितका संयम ,आत्मनियमन बाळगणे आवश्यक असते.हे ज्याला जमते तो सोबत येतो.

शिवराम पाटील,९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच.जळगाव

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता

10 वर्षे तुरुंगवास ते १ कोटी दंड; पेपरफुटी विरोधी कायद्यात काय आहे तरतूद?

नवी दिल्ली – पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो ते करून दाखवलं

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे.

दगडफेकीप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल, १४ जणांना अटक

जामनेर –  येथील जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याप्रकरणी व पोलिसांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एकूण ३००

वकीलपत्र घेण्यावरून न्यायालयात तुफान हाणामारी; शहर पोलिसात परस्पर विरोधात तक्रार दाखल

जळगाव – शिवाजीनगर परिसरासह वेगवेगळ्या भागात गोमांस विक्रीप्रकरणी अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर एका गटाने वकीलाला धमकल्याप्रकरणी तसेच वकीलपत्र घेण्यावरून