भुसावळ येथे शिवसेना उबाठा पक्षाचा निर्धार मेळाव्याचे आयोजन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथील चितोडे वाणी समाज मंगल कार्यालय येथे दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवसेना उबाठा पक्षाचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्धार मेळाव्याचे आयोजन भुसावळ शहर व भुसावळ तालुका उबाठा पक्षाच्या वतीने करण्यात आलेले असून प्रमुख मार्गदर्शक संपर्क प्रमुख संजय सावंत हे राहणार असून सह संपर्क प्रमुख विजय परब, मा आ दिलीप भोळे,मा नगराध्यक्षा माधुरी फालक, जिल्हा प्रमुख दिपकसिंह राजपूत, संघटीका पुनम बऱ्हाटे, संजय गोवेकर, जगदिश कापडे, सरला कोळी, विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे हे प्रमुख अतिथी राहणार आहेत. या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भुसावळ शहर व भुसावळ तालुका शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.