शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेनेचे स्टार प्रचारक खान्देशची मुलूखमैदान तोफ राज्यात धडाडणार !

जळगाव –  प्रतिनिधी दि.२७ मार्च – “ खान्देशची मुलूखमैदान तोफ “ म्हणून परिचीत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते मार्च गुलाबराव पाटील यांची स्टार प्रचारक म्हणून निवड झाली आहे. ना. गुलाबराव पाटील यांची तोफ आता लोकसभा निवडणुकांच्या निमीत्ताने संपूर्ण राज्यात धडाडणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रकारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण 40 नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. यातशिवसेना नेते तथा “ खान्देशची मुलूखमैदान तोफ ” पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा देखिल स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. ना. गुलाबराव पाटील यांचे उत्तम वक्तृत्व असल्याने राज्यभरातून त्यांच्या सभेची मागणी होत असते. यंदाही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यात ना. गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार आहे.

असे आहेत स्टार प्रचारक

या यादीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा, शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री दिपक केसरकर, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, आमदार भारत गोगावले यांची नावे आहेत.

हे देखिल प्रचाराच्या मैदानात उतरणार

त्याचबरोबर माजी मंत्री दिपक सावंत, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार मनिषा कायंदे, मुख्य समन्वयक नरेश म्हस्के, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, प्रवक्ते राहुल लोंढे, उपनेते कृपाल तुमाने, आमदार आशिष जैयस्वाल, पूर्व विदर्भातील शिवसेना संघटक किरण पांडव हे नेते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh