मोटरसायकल – ट्रक अपघातात शिंदी ग्रामपंचायतीमधील कर्मचारी ठार

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील भुसावळ – जामनेर रस्त्यावर चोरवड गावानजीक अंदाज न आल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक वर मोटरसायकल आदळून शिंदी ता भुसावळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी संग्रामसिंग बाबुलाल राजपूत (वय ३८) यांचे निधन झाले.या बाबत सविस्तर माहिती अशी की , संशयीत चारचाकी वाहन चालक विलास भिवसन पाडोळसे रा तळेगाव ता जामनेर याने आपल्या ताब्यातील ट्रक चोरवड गावाजवळ उभा केला होता. त्याच वेळेस संग्रामसिंग राजपूत हा कुऱ्हा पानाचे गावाकडून भुसावळ कडे येत होता मात्र रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यामुळे तो उभ्या असलेल्या ट्रक वर धडकला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या बाबत दिपक मोतीलाल राजपूत यांनी खबर दिली असता भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.