गोंभी शिवारात बिबट्याचे दर्शन ? शेतकरी व मजूर भयभीत 

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथून जवळच असलेल्या गोंभी शिवारात वांजोळा रस्त्यावर बिबट्या दिसल्याने शेतकरी व मजूर भयभीत झाले असून या बाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

या बाबत माहिती अशी की , दि २७ रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान सुनसगाव येथील शेतकरी धनराज पांडुरंग भोळे हे वांजोळा – गोंभी रस्त्यावर असलेल्या पिंपरी शिवारातील शेतात पाईप लाईन चा व्हाॅल बदलवण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या वाघ कपाशी लागवड असलेल्या शेतात दिसला त्या नंतर बिबट्या शेजारी असलेल्या गवताच्या शेतात गेला हे पाहून त्यांनी आपले भाऊ माजी ग्रामपंचायत सदस्य महेश भोळे यांना माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन महिती देण्यात आली .

सध्या या परिसरात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे सध्या सुनसगाव व बेलव्हाळ तसेच गोंभी शिवारात बिबट्या दिसत आहेत त्यामुळे शेतकरी व मजूर भयभीत झाले आहेत.आता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी काय निर्णय घेतात याकडे शेतकरी व शेतमजूर यांचे लक्ष लागले आहे.

या परिसरात बिबट्या असल्याच्या वृत्ताला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे त्यामुळे गावागावात वनविभागाने शेतकऱ्यांच्या सभा घेऊन माहिती द्यावी अशी मागणी केली जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh