शेतकऱयांचे आंदोलन चिघळणार मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनाने शेतकऱयांना चिरडले

जळगाव संदेश न्युज नेटवर्क

उत्तर प्रदेशच्या लखिमपूर-खेरीमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या गावात उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमापूर्वी मोठा गदारोळ झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी एकत्र आलेल्या शेतकऱयांची प्रथम पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांसोबत झटापट झाली. यादरम्यान मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांनी काही आंदोलक शेतकरी चिरडल्याची घटना घडली. या घटनेत अनेक शेतकरी जखमी झाले. तर दोन शेतकऱयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती कळताच आंदोलक शेतकऱयांनी जाळपोळ सुरू केली आहे. अनेक वाहनांना त्यांनी पेटवून दिले आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी टेनी गावात उपमुख्यमंत्री मौर्य यांना भेटणार होते. यावेळी शेतकऱयांनी गावातील मैदानात निर्माण करण्यात आलेल्या हेलिपॅडवर कब्जा केला. शेतकरी मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणार होते. टिकुनिया येथे शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी उभे राहिले. याचवेळी खासदार आणि गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने शेतकऱयांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव पाहता लखिमपूरमधील इंटरनेट सेवा रोखण्यात आली आहे. लखिमपूरमधील घटनेच्या विरोधात सोमवारी देशभरात निदर्शने करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. तर काँग्रेस नेत्या प्रियंका वड्रा आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे सोमवारी लखिमपूर खेरी येथे पोहोचणार आहेत. तर पंजाब आणि अंबालामध्ये शेतकरी रस्त्यांवर उतरले आहेत. त्यांनी अनेक महामार्गांवरील वाहतूक रोखून धरली आहे. तर केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱयांच्या मारहाणीत 3 भाजप कार्यकर्ते तर एक चालक मारला गेल्याचा दावा केला आहे.

3 शेतकऱयांच्या मृत्यूचा दावा

या घटनेनंतर संतप्त शेतकऱयांनी तेथे उभ्या करण्यात आलेल्या अनेक वाहनांना पेटवून दिले आहे. तर तणाव पाहता मोठय़ा प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. लखनौमधून आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह देखील घटनास्थळासाठी रवाना झाले आहेत. या घटनेत 3 शेतकऱयांचा मृत्यू झाल्याचा दावा भारतीय किसान युनियनने केला आहे. पण जिल्हा प्रशासनाने अद्याप याची पुष्टी दिलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत गाझीपूर येथून लखिमपूर-खेरीसाठी रवाना झाले आहेत. या घटनेनंतर संयुक्त किसान मोर्चाने सर्व जिल्हय़ांमधील शेतकऱयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. टिकैत लखिमपूर-खेरी येथे पोहोचताच शेतकरी संघटना पुढील रणनीती ठरविणार असल्याचे समजते. तरीही सद्यस्थितीत या घटनेचा तपास स्थानिक प्रशासनाकडून न करता सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

अखिलेश यादवांकडून टीका

याप्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केला आहे. कृषी कायद्यांना शांततेने विरोध करणाऱया शेतकऱयांना भाजप नेत्याच्या पुत्राकडून वाहनाने चिरडण्याचे कृत्य अमानवीय आणि क्रूर आहे. उत्तर प्रदेश दांभिक भाजप नेत्यांचा अत्याचार आता सहन करणार नाही. हीच स्थिती राहिल्यास उत्तर प्रदेशात भाजप नेते गाडीतून जाऊ शकणार नाहीत आणि उतरूही शकणार नाहीत असे अखिलेश यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींकडूनही लक्ष्य

जो या अमानवीय नरसंहाराला पाहून देखील गप्प आहे, तो पूर्वीच निष्प्राण झाला आहे. पण आम्ही या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणार नाही असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित