स्मृती शेष चमेली भाऊराव काव्य कादंबरी पुरस्कार घोषित – शशिकांत हिंगोणेकर .

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने २०२३या वर्षासाठी राज्यपुरस्कारासाठी कवितासंग्रह आणि कादंबरी चे प्रस्ताव दोन प्रतीत मागवण्यात आलेले होते. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातातून उदंड प्रतिसाद लाभला. कवितेसाठी ५७ कवितासंग्रह आणि कादंबरीसाठी १५ प्रस्ताव प्राप्त झालेले होते. निरपेक्ष परिक्षणातून हे पुरस्कार निश्चित करण्यात आलेले आहेत. स्मृतीशेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्यपुरस्कारासाठी

शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर तर्फे प्रकाशित सीसीटीव्हींच्या गर्द छायेत कवी गीतेश शिंदे रा ठाणे यांना तर स्मृतीशेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कारासाठी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस पुणे तर्फे प्रकाशित

एक भाकर तीन चुली देवा गोपीनाथ झिंजाड यांना हे पुरस्कार घोषित करण्यात येत आहेत. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रु. पाच हजार, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. संयोजक उषा हिंगोणेकर आणि शशिकांत हिंगोणेकर जळगाव यांचेवतीने सन्मानपूर्वक हे पुरस्कार वितरीत करण्यात येतील. सर्व सहभागी कवी कादंबरीकार आणि विजेत्यांचे

प्रतिष्ठानच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.