राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत मोठी घोषणा केली आहे. कार्यकर्त्यांना संबोधीत करताना त्यांनी आज राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांची जबाबदारी या दोघांवर असणार आहे. मात्र अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे जबादारी सांभाळतील.