राष्ट्रवादीच्या सदस्यीय समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय…राजीनामा एकमताने नामंजूर करून पवारांकडे पाठवण्यात आलाय…अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेपर्यंत पदावरच राहावं असा ठराव पारित करण्यात आलाय…पवार हे देशाचे नेते आहेत…त्यांची राज्यासह देशाला गरज आहे…त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी राहावं अशी भावना सगळ्यांची आहे…
अजित पवार कुठे आहेत?
शरद पवार यानी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत अजित पवार वगळून राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व नेते उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार आहेत कुठे असा प्रश्न विचार जात आहे. या ठिकाणी कोण उपस्थित आहे की नाही याची चर्चा आता करु नये. अजित पवार गैरहजर असल्याचा वेगळा अर्थ काढून नका असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच अजित पवार यांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती असंही शरद पवार यांनी म्हटलंय.
शरद पवारच गॉडफादर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम राहाणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपण आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. उत्ताराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी आता अधिक जोमाने काम करणार, पक्षात नवीन नेतृत्व घडवण्याचं काम करणार, माझ्या निर्णयामुळे पदाधिकारी, जनता कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. देशभरातील विविध पक्षांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती, त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.