‘महाभारत’ मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन

‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनि मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे आज सोमवारी 5 जुन रोजी निधन झाले आहे.

वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होता. तर त्यांचे सहकलाकारा सुरेंद्र पाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कारार होणार आहे.

गूफी पेंटर यांची तब्येत जेव्हा खालावली तेव्हा ते फरीदाबाद येथे होते. सगळ्यात आधी त्यांनी फरीदाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना मुंबईत आणलं होतं. गुफी पेंटल यांच्या निधनाची बातमी ही फिल्मफेअरनं त्यांच्या अधिकृत ट्विटरवर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत दिली आहे.

गुफी यांनी 1975 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘रफू चक्कर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. त्यांनी 80 च्या दशकात अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, गुफी पेंटल यांना खरी ओळख ही 1988 साली प्रदर्शित झालेल्या बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतून मिळाल होती. या मालिकेत त्यांनी शकुनीमामा ही भूमिका साकारली होती. गुफी हे सगळ्यात शेवटी ‘जय कन्हैया लाल की’ या मालिकेत दिसले होते.

गुफी पेंटल यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी सैन्यात होते. दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीत गुफी यांनी हा खुलासा केला होता. त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं की “1962 मध्ये जेव्हा भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरु होतं आणि तेव्हा मी इंजीनियरिंगचं शिक्षण घेत होतो. युद्धाचा काळ असल्यानं कॉलेजमध्ये सैन्य भरती सुरु होती. मला नेहमीच सैन्यात भरती व्हायचे होते आणि अशात माझ्यासमोरही संधी मिळाली. त्यानंतर मला पहिली पोस्टिंग ही आर्मी आर्टिलरीमध्ये चीनच्या सीमेवर मिळाली होती.”

पुढे गुफी पेंटल म्हणाले होते की, “सीमेवर असल्यानं सैनिकांचे मनोरंजन करण्यासाठी काहीच नव्हतं. त्यात टीव्ही आणि रेडिओ सुद्धा नव्हते. त्यामुळे सैनिक सीमेवर रामलीला करायचे. रामलीलामध्ये मी सीतेची भूमिका साकारायचो आणइ रावणाच्या वेशात एक व्यक्ती स्कूटरवर येऊन माझे अपहरम करत असे. मला अभिनयाची आवड होती आणि त्या काळात मला प्रशिक्षण मिळालं. त्यानंतर 1969 मध्ये लहाणभावाच्या सांगण्यानं मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर मी मॉडेलिंग आणि अभिनयाचे शिक्षण घेऊ लागलो आणि अशा प्रकारे मी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले”.

jalgaonsandesh

jalgaonsandesh