या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एल.आय.सी एडमिन अधिकारी श्री राहुल सोनवणे साहेब प्रमुख उपस्थिती सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे व गोपालनगर पुनर्वसन ग्रामपंचायत सदस्य श्री दिलवर पावरा हे उपस्थित होते.
यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले ते म्हणालेत की, सेवाभावी प्रतिष्ठान ही गेल्या तीन वर्षापासून सातत्याने काम करणारी संस्था आहे. शहरी भागात मोठ्या थाटात दिवाळी सण उत्सव मनवला जातो परंतु ग्रामीण भागात दिवाळी सण साजरा करावा असे सेवाभावी प्रतिष्ठानच्या विचारात आले व संस्थेने मागील वर्षीपासून दिवाळी सण हे ग्रामीण भागात चिमुकल्याण सोबत साजरा करत असते. दिवाळीच्या फराळ व शैक्षणिक साहित्य वही पेन देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी एल.आय.सी एडमिन अधिकारी श्री राहुल सोनवणे साहेब म्हणालेत की, सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्य मी गेल्या तीन वर्षापासून पाहत आहे या संस्था उपक्रम केला आहे हा खूप छान आहे शहरात खूप थाटामाटात दिवाळी साजरा केली जाते परंतु ग्रामीण भागात देखील अशा प्रकारे दिवाळी साजरी करणे ही खूप कौतुकाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमाला श्री अमित पाटील श्री कल्पेश सोनवणे श्री हितेश कलाल श्री पवन सोनवणे श्री अशोक पावरा श्री जंगलसिंग पावरा श्री सुभाष पावरा व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.