दिव्यांग सेनेच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव देवोड मेट सावरगावकर यांची निवड

प्रतिनिधी – दता बोईनवाड

भोकर – उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या दिव्यांग तालुका प्रमुख पदी विठ्ठलराव देवोड मेट सावरगावकर यांची निवड जाहीर करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे दिव्यांग (अपंग) व शिवसेनेच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक दि.१६ डिसेंबर रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी दिव्यांग लोकांसाठी तळमळीने काम करणारे मौजे मेट सावरगावकर येथील विठ्ठलराव देवोड यांची भोकर तालुका दिव्यांग सेना तालुका प्रमुख म्हणून यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख बबन बारशे यांनी नवनिर्वाचित दिव्यांग तालुका प्रमुख विठ्ठल देवोड यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.यावेळी जिल्हा समन्वयक अँड.परमेश्वर पांचाळ, जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, तालुका प्रमुख संतोष आलेवाड, तालुका संघटक नंदु पाटील कौठेकर, जिल्हा शिव आरोग्य सेनेचे संघटक सुनील जाधव,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, चेअरमन साहेबराव पाटील भोंबे, माजी सर्कल प्रमुख रमेश महागावकर, पांडुरंग कटकमवाड हे उपस्थित होते.

ताजा खबरें