शाळेत हिंदू मुलींनी परिधान केला ‘हिजाब’? फोटो समोर आल्याने चौकशीचे आदेश!

मध्य प्रदेशातील दमोह येथील गंगा जमुना उच्च माध्यमिक या खासगी शाळेत हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालायला लावल्याचा आरोप आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाचे पोस्टर लावण्यात आले होते.

ज्यामध्ये विद्यार्थिनी हिजाब परिधान केलेल्या दिसल्या होत्या. यानंतर या प्रकरणाने पेट घेतला आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांना याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

चार विद्यार्थिनी हिजाब परिधान केलेल्या दिसल्या

खासगी शाळेत लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये विद्यार्थिनींचे फोटो असून, सर्व विद्यार्थिनींनी डोक्यावर हिजाबसारखे कापड गुंडाळले आहे. मुस्लिम विद्यार्थिनींसोबत चार हिंदू विद्यार्थिनीही हिजाब परिधान केलेल्या दिसत आहेत. (MP News)

दरम्यान, शाळा हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. शाळेची नोंदणी रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

दमोहचे जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल म्हणाले की, याप्रकरणी यापूर्वी चौकशी करण्यात आली होती, परंतु काही आढळले नाही. मात्र गृहमंत्र्यांच्या सूचनेनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी तहसीलदार, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात येत आहे.

दरम्यान शाळेचे मालक मुस्ताक खान यांनी सांगितले की, गणवेशात हेडस्कार्फचा समावेश आहे आणि कोणालाही तो घालण्याची सक्ती करण्यात आली नाही. मात्र याप्रकरणी

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका शाळेच्या नावाखाली हिंदू आणि इतर गैर-मुस्लिम मुलींना बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

ताजा खबरें