सावदा पोलीसांच्या धडक कारवाईने दारू विक्रेत्यांना भरली धडकी !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – सावदा ता रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावात काही दारु विक्रेते हातभट्टी तयार करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना व सहकारी पोलीसांना मिळताच खिरोदा व जानोरी येथे कारवाई करण्यात आली.

जानोरी येथे गावठी दारु, कच्चे रसायन असा माल नष्ट करुन संशयीत आरोपी मुकद्दर जुम्मा तडवी रा. जानोरी याला अटक करण्यात आली तर खिरोदा येथे अवैध दारु विक्रेता समीर लतिब तडवी याला अटक करण्यात आली दोन्ही संशयीत आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आहे.

ही कारवाई सावदा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त एपीआय विशाल पाटील, पोकाँ संजय चौधरी, निलेश बाविस्कर, पो ना. सुनिल सैंदाणे यांच्या पथकाने केली असून एपीआय विशाल पाटील साहेब पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये धडक कारवाई करीत असल्याने दारु विक्रेत्यामध्ये धडकी भरली आहे. सावदा पोलीसांनी केलेल्या कारवाई मुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व पोलीसांचे कौतुक केले जाते आहे.

ताजा खबरें