मौजे ल्याहरी येथील ग्रामसेवकांच्या विरोधात सरपंच व गावकऱ्यांनी बसले उपोषणास

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड

भोकर – हादगाव मौजे ल्याहरी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील ग्रामसेवक अमोल सोनटक्के यांच्या बाबतीत ल्याहरी येथील सरपंच व गावकऱ्यांनी बऱ्याच वेळेस गट विकास अधिकारी पंचायत समिती हदगाव यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांची बदली करण्यास विनंती केली होती. अमोल सोनटक्के ग्रामसेवक हे ग्रामपंचायत मौजे ल्याहरी येथे मागील आठ ते नऊ वर्ष पासून कार्यरत असल्यामुळे त्यांनी गावातील राजकारणामध्ये सहभाग घेने गावात कोणत्याच प्रकारचा विकास न करणे गावात चुकली करणे गावातील राजकीय पुढार्‍यांसोबत राहून त्यांच्या म्हणण्या नुसार गावातील गोरगरिबावर अन्याय करणे ग्रामपंचायतला आलेला निधीची व्यवस्थित नियोजन न करणे व परस्पर त्या निधीची विल्हेवाट लावणे ग्रामपंचायत मधील स्व निधी जमा करून तो ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा न करताच त्या रकमेची परस्परविले वाट लावणे. असे अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करून अमाप संमती जमा केल्याचा त्यांनी त्यांच्या नोकरीच्या काळात मोठा भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती जमा करून नांदेड येथे दोन ते चार कोटीचा बंगल्याचे बांधकाम केले आहे. फक्त नोकरीत भ्रष्टाचार करून एवढी मोठी कमाई केली त्याची आयकर विभागा मार्फत सखोल चौकशी करावी, सदरील ग्रामसेवक हे गावातील लोकांच्या कोणत्याच समस्या सोडवीत नाही. त्यामुळे गावातील गोरगरीब जनता परेशान आहे. गावकऱ्यांनी मागील दोन वर्षापासून त्यांची बदली करण्याकरिता अनेक निवेदन दिलेले आहेत गट विकास अधिकारी यांनी सदरील ग्रामसेवक यांच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. व बदली करण्यासाठी कोणतीही कार्य होत नसल्याने ग्रामसेवक आणखीन मुजोर होत असलेला आहे व भ्रष्टाचार वाढतच चालेला आहे.

तरी या भ्रष्टाचारी ग्रामसेवकांच्या विरोधात सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका इतर महिला दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्याल ल्याहरी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. त्या उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. अशा आशयाचे निवेदन देऊन उपोषणास बसले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh