संजय राऊत यांचा दावा; दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील

ऐन लोकसभा निवडणुकीत नारायण राणे आणि ठाकरे गटाने एकमेकांवर ‘शब्दबाण’ मारण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होणार असल्याचा दावा केला

राणेंच्या दाव्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दोन महिन्यानंतर सत्ता आल्यानंतर नारायण राणे हे तुरुंगात असतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते सांगलीत बोलत होते.

ठाकरे गटाने सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर काँग्रेसचा दावा होता. मात्र, ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊ केली. आता चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत पोहोचल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सांगलीच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांवर भाष्य केलं.