समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीला सोशल मीडीयावर धमक्या; केली सुरक्षेची मागणी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांना आणि त्यांची पत्नी क्रांती रेडेकर  हिला गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत असल्याचे सांगून सुरक्षेची मागणी केली आहे. या बाबतची मागणी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहुन करणार असल्याचे सांगितले आहे.

एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर असलेले समीर वानखेडे यांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर अभिनेता शाहरुख खानकडून त्याचा मुलगा आर्यन खानला कायद्याच्या कचाट्यातून सोडवणूक करण्यासाठी 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, “गेले काही दिवसांपासून मला आणि माझ्या पत्नीला सोशल मीडीयावर धमक्या मिळत आहे. मी याबाबत आज मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विशेष सुरक्षेची मागणी करणार आहे,” असे ते म्हणाले.