साकळी येथील जि.प.मराठी मुलींच्या शाळेस पालकाने दिली भेटवस्तू 

दिपक नेवे

लोकसहभागातून-शाळेचा विकास ‘ या उपक्रमाअंतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत एका सर्वसामान्य पालकाने शाळेस घड्याळ भेटवस्तू देऊन शिक्षणक्षेत्राप्रती दाखवलेली औदार्याची भावना कौतुकास्पद ठरली आहे.सदर पालक साकळी येथील रहिवाशी असून त्यांचे नाव सुनील भिल आहे. यांच्या कु.राजविता सुनिल भिल ( इ. 3 री) कु.देविता सुनिल भिल (इ.2 री ) या दोन्ही मुली शाळेत शिक्षण घेत आहे. पालक सुनिल भिल यांनी दिलेल्या भेटवस्तूचा स्वीकार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंगला सपकाळे यांनी केला. यावेळी शाळेतील शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.सदरील शाळेत पालक सुनिल भिल यांनी भेटवस्तू दिल्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh