वराडसिम – सुनसगाव रस्त्याची दयनीय अवस्था !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – बेलव्हाळ रस्त्यावर बेलव्हाळ फाटा ते वराडसिम या पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी म्हणण्याची वेळ आली असून व्हाया बेलव्हाळ मार्गे वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे.

या बाबत माहिती अशी की, सुनसगाव कडून वाघुर धरण किंवा वराडसिम व कंडारी या गावांना जाण्यासाठी सुनसगाव- बेलव्हाळ या रस्त्यावर बेलव्हाळ फाटा या ठिकाणाहून वराडसिम गावाकडे जाणारा मार्ग आहे. हा जवळचा मार्ग असल्याने वराडसिम परिसरातील नागरिक, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने याच मार्गाने जळगाव, नशिराबाद कडे प्रवास करीत असतात मात्र गेल्या काही वर्षांपासून हा वराडसिम – बेलव्हाळ फाटा रस्ता अतिशय खराब झाला असून या रस्त्यावरून पायी चालणे ही कठीण झाले आहे. मोटरसायकल चालविणे म्हणजे एक कसरत करावी लागत आहे. मोठमोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत तसेच खड्डे पडले असून वाहन चालवताना त्रास होत असल्याने नागरीक व्हाया बेलव्हाळ मार्गे ये जा करीत आहेत . त्यामुळे संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर वराडसिम – बेलव्हाळ फाटा रस्ता दुरुस्ती करण्यात यावी विशेष म्हणजे यासाठी आ. संजयभाऊ सावकारे यांनी लक्ष घालून या परिसरातील नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वराडसिम, सुनसगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh