सांड माजावर आला .

गावात एक बैल असे.सार्वजनिक बैल.ग्रामपंचायतचा बैल.ज्याला सांड म्हणत.तो कोणत्याही शेतात शिरून धुमाकूळ घालत असे.त्याला शिक्षा नाही.कोंडवाडा नाही.तो कोणत्याही गाईला आणि बाईला धडक दिली तर वाईट मानत नाहीत.कारण तो सर्वानुमते, सर्वमान्य, सन्मानित केला होता.हे स्थान ,हा मान,ही शान आता जळगावच्या नगरसेवकांनी मिळवली आहे.

आम्ही आमच्या कॉलनीत,वार्डात,प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरपालिकेत प्रतिनिधी निवडून देतो.अपेक्षा असते याने सरकार दरबारी जाऊन निधी आणावा आणि काम करावे.पण जितकी अपेक्षा ठेवतो तितकी गुणवत्ता तपासून पहात नाही.जो दारू, सट्टा चा धंदा आणि रेती ,राशन ची चोरी करतो ,जो गणपती, नवरात्री, शिवजयंती ला देणगी देतो त्याला आम्ही नागरिक भला माणूस समजतो.आणि हजार पाचशे दिले कि मतदान करतो.येथेच आमची चूक होते.तिच चूक आम्ही दर पांच वर्षांनी रिपीट करतो.त्यामुळे त्या माणसाला गैरसमज होतो कि,या वीस पंचवीस हजार लोकांमधे मीच सुपरमॅन आहे.जसा शे दोनशे बैलांमधे मीच सांड आहे.अशा बैलाला सांड चा सन्मान आम्हीच देतो.

जळगाव शहरात असे अनेक बैलांना आम्ही नागरिकांनी सांड बनवले आहे.त्यांना लुट करण्याची छुट दिली आहे.तो कोणत्याही रेती माती डांबर सिमेंट चे कमीशन खाऊ लागला आहे.नाही तर वाट्टेल तेथे शिंग मारू लागला आहे.त्याने अनेक नागरिकांना जखमी केले.पळवले.धाकवले.

जळगाव नगरपालिकेत असे अनेक सांड आम्ही आमच्या सहमतीने पाठवले आहेत.एकाने तर माईक घेऊन महापौराला मारला.दुसरा तर सरळ व्यासपिठावर जाऊन चढला.तिसरा तर कॉलर पकडून गुद्दा मारू लागला.चौथा तर सरळ मक्तेदाराला धमकी देऊ लागला.पांचवा तर दारू ढोसलून माय बहिण एक करू लागला.सहावा तर ओपन स्पेश बळकावून बसला.काल परवाच एका सांडने तर चक्क एका मक्तेदाराला भांड भांड करुन इज्जतीचा फालुदा केला.आता या सांडांची बायका पोरांना,माणसांना भीती वाटू लागली आहे.आम्हीच सोडलेला, आम्हीच वाढवलेला,आम्हीच पोसलेला सांड आता आमचीच खाण खोदू लागला आहे.तर आता याचे ” सांड ” पद बरखास्त करण्याची वेळ आलेली आहे.रेती माती दारू राशन कमीशन चा खुराक बंद करण्याची वेळ आलेली आहे.

एकाच बैलाला पुन्हा पुन्हा सांड पदावर निवडून दिल्याचा हा दुष्परिणाम आहे.आता गावातील नागरिक या सांड पासून त्रस्त झालेला आहे.आमचे गांव, गावातील माणसे ,बायको,पोरं वाचवायची असतील तर हा सांड बदलणे आवश्यक झाले आहे.आता आमचा सांड माजावर आला आहे.

शिवराम पाटील ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव

ताजा खबरें