रोटरी इंटरनॅशनल इंडिया चे अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार ..!! रोटरी जळगाव रॉयल्स चे सहकार्याने उद्दिष्टपूर्ती साठी पुढाकार, !”:

वीरेंद्र मंडोरा

                                  जळगाव -आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी रोटरी क्लब व श्री श्री रविशंकर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने एक देश एक दिवस व एक दशलक्ष लोकांचे ब्लड शुगर टेस्ट करण्याचे नियोजन केलेले होते व या करता रोटरी क्लब ऑफ इंडिया राष्ट्रीय स्तरावर एक दिवसाचे चेक अप करण्याचे नियोजन केले होते आज पर्यंत एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने जगात कोठेही चेकअप कॅम्प झालेले नव्हते व हे केल्यामुळे याची नोंद अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे. याकरता भारतातल्या सर्व रोटरी क्लब व त्यांचे सभासद यांच्या अथक परिश्रमामुळे हे साध्य होणार होते व या करता जळगाव शहरातील रोटरी क्लब व जळगाव रॉयल्स यांनी टॉवर चौकात मंडोरा चेंबर्स इथे 100 लोकांच्या तपासणीचे उद्दिष्ट पूर्ण केले या उपक्रमात प्रामुख्याने जळगाव चे आमदार श्री राजू मामा भोळे व शिवसेना जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री विष्णू भाऊ भंगाळे यांची उपस्थिती राहिली या उपक्रमात रोटरी सेंट्रल चे ही सदस्य श्री महेंद्र गांधी व श्री अजय जैन उपस्थित होते. व डॉक्टर जितेंद्र मंडोरा यांनी सहकार्य केले.

या उपक्रमाचे पूर्तीसाठी रोटरी जळगाव रॉयल्स चे प्रेसिडेंट श्री स्वप्नील जाखेटे सेक्रेटरी सचिन जेठवाणी ,सचिन खडके, दीपक पाटील , व विजय लाठी यांनी विशेष परिश्रम घेऊन हे उद्दिष्ट पूर्ण केले