ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, BMW जळून खाक

भारतीय टीमचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पंत जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याच्यावर उपचार सुरू आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली.

डिव्हायडरला धडकल्यानंतर कारला आग लागली. अचानक झालेल्या या अपघातात पंत जखमी झाला आहे. पंत हा त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवत होता. उत्तराखंडमधील रुरकीजवळ हा अपघात झाला. या अपघातात पंत जखमी झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh