उघड्या डिपीने घेतला 3 म्हशींचा बळी; कंपनीच्या कारभाराचा शेतकऱ्याला फटका

जळगाव – कुसुंबा येथे उघड्या विद्युत रोहित्रातून विजेचा धक्का लागून रस्त्याने जाणाऱ्या तीन म्हशी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यात शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी रवींद्र गुलाब पाटील (वय-४१) परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीला जोडधंदा म्हणुन ते दुग्ध व्यवसाय करतातात. नेहमीप्रमाणे रविवारी (ता.१२) सकाळी ९ वाजता ते त्यांच्या मालकीच्या ३ म्हशी घेऊन शेतात चारण्यासाठी नेत होते.

त्यावेळी रस्त्यावरील इलेक्ट्रिक डीपी जवळून म्हशी जात असताना त्यांना उघड्या डीपीतील वीजतारेचा धक्का लागल्याने तीन म्हशी जागीच ठार झाल्या. घटना घडल्यानंतर कुसुंबा गावाचे पोलिस पाटील राधेश्याम चौधरी यांनी धाव घेवून पाहणी केली.

त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून जेसीबीच्या माध्यमातून म्हशींचे मृतदेह दफन करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

महावितरण कंपनीच्या भोंगळ कार्ड कारभारामुळे रविंद्र पाटील या शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी देखील मागणी केली जात आहे.

म्हशींना मिळेना नुकसान भरपाई

पै न पै जोडून शेतकऱ्याने म्हशी गोळा केल्या.. बाजारभावानुसार लाख रुपयांच्या घरात एक म्हैस पडते. मात्र, अशी दुर्घना घडली की, महावितरण हात वर करुन मोकळे होते. गेल्या वेळेस कुसुंब्यात अशाच घटनेत शेतकऱ्यास मेटाकुटीस आणून नंतर पंधरा हजार रुपये फेकून मारल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी बोलून दाखविा. महावितरणच्या मानवी चुकीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊनही महावितरण करुन शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याने ग्रामीण भागात महावितरणा विरुद्ध प्रचंड रोष आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh