सुनसगाव येथे अपंग निधी मिळण्यासाठी निवेदन !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे शासनाकडून अपंगांना मिळणारा निधी थेट अपंग व्यक्तींच्या बॅंक खात्यात जमा होऊन मिळावा यासाठी गावातील अपंग व्यक्तींच्या शिष्टमंडळाने ग्रामसेविका प्रतिभा तायडे यांना निवेदन दिले असून निवेदना सोबत प्रत्येक व्यक्तीचे अपंग प्रमाणपत्र, आधार कार्ड, शासकीय जी आर व कागदपत्रे सादर केली आहेत. या बाबत मासिक सभेत या विषयावर चर्चा करण्यात आल्याचे समजते मात्र काय निर्णय झाला हे समजू शकले नाही. अपंगांचे म्हणणे आहे की निधी खात्यात जमा करा आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे की अपंग व्यक्तीने तो निधी ज्या साठी खर्च करेल त्याचे जीएसटी बील आणून द्यावे.

असे समजते.प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनावर प्रशांत पाटील, लिलाधर पाटील, योगेश पाटील, सतिश कोळी, चेतन कोळी,सुदाम कोळी,गलू कोळी, शामराव सपकाळे, दिलीप भोळे,तेजस पाटील,गलू कंखरे, कमलाकर शिंदे यांच्या सह्या आहेत. या बाबत सरपंच व उपसरपंच व सदस्य काय निर्णय घेतात याकडे अपंगांचे लक्ष लागून आहे.