एमआयडीसी मध्ये 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; तब्बल 802 जागांवर भरती

जळगाव – सरकारी नोकरी मिळविण्यासाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात होणाऱ्या भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर झाली आहे.

दहावी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात ठेवा अर्ज २ सप्टेंबर, २०२३ पासून ते २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत करता येईल.

या भरतीद्वारे एकूण 802 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

या पदांसाठी होणार भरती :

1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 03

3) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) 03

4) सहयोगी रचनाकार 02

5) उप रचनाकार 02

6) उप मुख्य लेखा अधिकारी 02

7) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 107

8) सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) 21

9) सहाय्यक रचनाकार 07

10) सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ 02

11) लेखा अधिकारी 03

12) क्षेत्र व्यवस्थापक 08

13) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 17

14) कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) 02

15) लघुलेखक (उच्च श्रेणी) 14

16) लघुलेखक (निम्न श्रेणी) 20

17) लघुटंकलेखक 07

18) सहाय्यक 03

19) लिपिक टंकलेखक 66

20) वरिष्ठ लेखापाल 06

21) तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) 32

22) वीजतंत्री (श्रेणी-2) 18

23) पंपचालक (श्रेणी-2) 103

24) जोडारी (श्रेणी-2) 34

25) सहाय्यक आरेखक 09

26) अनुरेखक 49

27) गाळणी निरीक्षक 02

28) भूमापक 26

29) विभागीय अग्निशमन अधिकारी 01

30) सहाय्यक अग्निशमन अधिकारी 08

31) कनिष्ठ संचार अधिकारी 02

32) वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल) 01

33) चालक तंत्र चालक 22

34) अग्निशमन विमोचक 187

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय:₹900/- ]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023

ताजा खबरें